25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeक्रीडाचेन्नईला धक्का, आरसीबी प्ले ऑफमध्ये

चेन्नईला धक्का, आरसीबी प्ले ऑफमध्ये

बंगळुरु : आरसीबीने अखेरच्या षटकात २७ धावांनी विजय साकारला आणि ते प्ले ऑफसाठी पात्र ठरले. आरसीबीने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि २१८ धावांचा डोंगर उभारला. आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. पण त्यानंतर राचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाचा डाव सावरला. पण ते दोघे बाद झाले आणि रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी यांच्यावर चेन्नईच्या विजयाची मदार होती. पण धोनी २५ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर सामना आरसीबीच्या बाजूने फिरला.

आरसीबीच्या २१९ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॅरिल मिचेल ४ धावांवर बाद झाला आणि त्यांची २ बाद १९ अशी अवस्था झाली. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि राचिन रवींद्र यांनी संघाला सावरले. पण अजिंक्य ३३ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. पण राचिनने यावेळी अर्धशतक झळकावले आणि संघाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. धोनी अखेरच्या षटकात २५ धावांवर बाद झाला. त्यामुळे सामना आरसीबीच्या बाजूने झुकला आणि त्यांनी विजयासह प्ले ऑफमध्येही स्थान मिळविले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR