17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरचोरीची दुचाकी विकण्याच्या तयारीतील चोर गजाआड

चोरीची दुचाकी विकण्याच्या तयारीतील चोर गजाआड

लातूर : प्रतिनिधी

मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार चोरलेली मोटरसायकल विकण्यासाठी मांजरा गेट रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी त्याला चोरलेल्या दोन मोटार सायकलीसह ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.

दि. १३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार चोरलेली मोटरसायकल विकण्यासाठी मांजरा गेट रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ मांजरा गेट रेल्वे परिसरात पोचून रोडवर मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव प्रथमेश महादेव पांचाळ, वय १८ वर्ष, राहणार येरोळ तालुका शिरूर अनंतपाळ, जिल्हा लातूर सध्या राहणार स्वामी समर्थ मंदिराजवळ लातूर असे असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटर सायकल काही महिन्यापूर्वी लातूर शहरातून प्रकाश नगर येथून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातून आणखीन एक मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले.

त्यावरून गुन्ह्यातील नमूद आरोपीला ताब्यात घेऊन त्यांने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करुन नमूद आरोपीकडून चोरीच्या २ मोटारसायकली ज्याची एकूण किंमत ३० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाणे मधील मोटरसायकल चोरी एक गुन्हा उघडकीस आलेला आहे. पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपीला पोलीस ठाणे एमआयडीसी च्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राजेश कंचे, चालक चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR