निलंगा : प्रतिनिधी
गत टर्ममध्ये विद्यमान आमदारांनी जनसंवाद यात्रा काढली होती. आता जन सन्मान पदयात्रा काढत आहेत. काही केले तरी परिवर्तन होणार आहे. हे लोकसभा निवडणुकच्या निकालातून सिध्द झाले आहे. ही जनसंवाद यात्रा म्हणजे केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश रेशमे, राष्ट्रवादीचे इस्माईल लदाफ, अनिल अग्रवाल हे उपस्थित होते.
अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, निलंगेकर यांचा राजकीय वारस फक्त जनता असून कोणी जॉकेट टोपी घालून राजकीय वारस होऊ पाहात आहेत मी निलंगेकर साहेबांच्या विचाराचा वारस आहे असे सांगून विकास कामासाठी पदयात्रा काढताय अनेक गावात उद्घाटन केले आहे तेथे कामच सुरू केले नाही त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. देवणी तालुक्यातील विजयनगर येथे तेथील तरूण गाडीच्या आडवे पडून त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला होता. सध्या आरक्षण प्रश्न ज्वलंत असून आमचा पाठींबा आहे. जातनिहाय जणगनणा करा अशी मागणी राहूल गांधी करीत आहेत.
यश अपयश आले तरी घरात बसून राहणार नाही. आता येत्या काळात खरा वारस खोटा वारस कोण हे जनताच ठरवेल. दि २४ तारखेला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली असून बहीणीवरच अत्याचार होत असले तर लाडकी बहीण योजना काढून काय उपयोग असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे ंिधडवडे निघाले आहेत. मागील तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला सरकार का घेत नाही हे सरकार निवडणुकांना घबरतय असा प्रश्न उपस्थित करीत विद्यमान आमदारांनी गेल्या वेळी कामगाराचे किट, साड्या, मिक्सर वाटले असा आरोप करून आता निवडणुका जवळ आल्याने जनतेने सावध राहावे असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केले.