24.4 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजपानच्या संस्थेला शांततेचा नोबेल

जपानच्या संस्थेला शांततेचा नोबेल

जगाला आण्विक शक्तीपासून मुक्त करण्याचा प्रयत्न
स्टॉकहोम : वृत्तसंस्था
२०२४ चा शांततेचा नोबेल पुरस्कार जपानमधील निहोन हिडानक्यो या संघटनेला मिळाला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवारी ही घोषणा केली. आण्विक शस्त्रांविरुद्ध दीर्घकाळ मोहीम चालवल्याबद्दल या संघटनेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. ही संघटना जग आण्विक शस्त्रांपासून मुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. दुस-या महायुद्धादरम्यान हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यातून जे लोक वाचले होते. या लोकांनी या संघटेची स्थापना केली. त्यांना हिबाकुशा म्हणून ओळखले जाते.

दुस-या महायुद्धादरम्यान हिरोशिमा आणि नागासाकी येथे अणुबॉम्ब टाकण्यात आले होते. या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी जग आण्विक शस्त्रांपासून मुक्त करण्यासाठी तळागाळात आंदोलन केले. या संघटनेने दीर्घ काळापासून केलेले प्रयत्न आणि कार्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळत आहे. या जगात पुन्हा अणुबॉम्बचा वापर होऊ नये, यासाठी या संघटनेचा प्रयत्न आहे. निहोन हिडानक्यो या वर्षी शांततेचा नोबेल देण्याचे आम्ही ठरवले याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या ८० वर्षात कोणत्याही युद्धात आण्विक शस्त्रांचा वापर झाला नाही. निहोन हिडानक्यो आणि हिबाकुशाच्या अन्य प्रतिनिधींनी केलेल्या असाधारण प्रयत्नांमुळे आण्विक शस्त्रांचा विरोध होण्यास मोठे योगदान दिले आहे.

संघटनेचे कौतुक
जगात आण्विक शस्त्रांसाठी स्पर्धा सुरू आहे. आण्विक शस्त्रे असलेले आपल्याकडील शस्त्रे अद्ययावत करत आहेत. तसेच नवे देश आण्विक शस्त्रे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आण्विक शस्त्रे जगासाठी सर्वात विनाशकारी आहेत, ही शस्त्रे नष्ट करण्यातच सर्वांचे आणि जगाचे हित आहे, असे सांगत या संघटनेच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR