26.1 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeसोलापूरजमिनीच्या वादातून चुलत्याची निर्घृण हत्या, मुंडकं दुचाकीवर ठेवून पुतण्या गेला पळून

जमिनीच्या वादातून चुलत्याची निर्घृण हत्या, मुंडकं दुचाकीवर ठेवून पुतण्या गेला पळून

टेंभुर्णी: जमिनीच्या वादातून पुतण्याने सावत्र चुलत्याचा गळा कापून निघृण हत्या केली. ही घटना माढा तालुक्यातील शेवरे येथील कुरणवस्तीवर घडली आहे. आरोपी मुंडके घेऊन फरार झाले असून टेंभुर्णी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. शंकर प्रल्हाद जाधव (वय ६५) असे त्या मयताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शंकर प्रल्हाद जाधव व आरोपी शिवाजी बाबासाहेब जाधव यांच्यात जमिनीचा वाद चालू होता. त्याचाच राग मनात धरून आरोपी शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव, अजित बाबासाहेब जाधव (सर्व रा. शेवरे ता. माढा) हे चार भाऊ चुलते शंकर जाधव (वय ६५) यांच्या घरी गेले. तेव्हा शिवाजी जाधव याने धारदार कुन्हाडीने वार करून शंकर जाधव यांचे मुंडके धडा वेगळे करून खून केला. नंतर आरोपी शिवाजी जाधव मुंडके घेऊन मोटारसायकलवरून फरार झाला.

शंकर जाधव यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. या घटनेची फिर्याद नरहरी नवनाथ बंडलकर यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव व अजित बाबासाहेब जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जोग हे करीत आहेत. कुरतेचा एवढा कळस होता की आरोपी शिवाजी जाधव याने शंकर जाधव यांचे मुंडके मोटारसायकलच्या टाकीवर ठेवून तो गेल्याचे नरसिंहपूर व संगम येथील पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात दिसून आल्याचे पुढे आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR