29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रजरांगेंनी मोदींची झोप उडवली; असदुद्दीन ओवेसींचा घणाघात

जरांगेंनी मोदींची झोप उडवली; असदुद्दीन ओवेसींचा घणाघात

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ वक्तव्यावरून ‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. मी मराठा समाजाला सलाम करतो, त्यांनी मोदींची झोप उडवली. जरांगेच मोदींचा पराभव करतील. मोदी मराठा विरुद्ध ओबीसी करत आहेत. मी ओबीसी बांधवांना सांगू इच्छितो की, तुम्ही मोदींच्या कटात अडकू नका. मोदी हे एकीच्या नावाखाली सर्वांमध्ये भांडण लावत आहेत, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला.

पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करत आहेत. मोदी मी तुमच्या विचारधारेला जिवंत असेपर्यंत मानणार नाही. आम्ही कधीही कोणत्या जातीच्या विरोधात नाही आणि राहणार नाही. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र, तुमचा एक नेता म्हणतो घुसून मारू.

आमचे लोक विधानसभेत गेल्यावर उत्तर देतील. २० तारखेला मतदान करून यांना उत्तर द्या, असे आवाहन असदुद्दीन ओवेसी यांनी मतदारांना केले. राज्यात अनेकजण इच्छुक असताना आम्ही १६ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील असले तरी ते निर्णय घेत नाहीत, ते फक्त चर्चा करतात. निर्णय मी घेतो, असे असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट करत पक्षांतर्गत असलेल्या नाराज वर्गाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

अनेक उद्योग बाहेर गेले
महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला जात आहेत. ६ महिन्यांत मराठवाड्यात ४३० शेतक-यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्रात झाली. अर्थसंकल्पात कृषीसाठी बजेट कमी केले. छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. हे पैसे तुमच्या खिशातून दिले का?, असा सवाल करत असदुद्दीन ओवेसी यांनी विरोधकांना टोला लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR