22.2 C
Latur
Thursday, July 25, 2024
Homeराष्ट्रीयजलआंदोलन पेटले!

जलआंदोलन पेटले!

पाण्यासाठी आंदोलन करणा-यांवर पाण्याचा मारा नागरिकांनी केला संताप व्यक्त

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पाण्याची टंचाईविरोधात भारतीय जनता पक्षाने दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. यादरम्यान दिल्लीतील आठ राज निवास रस्त्यावर भाजप कार्यकर्तांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हीडीओ समोर आल्यानंतर यावर सोशल मीडियातून संताप व्यक्त केला जात आहे.

दिल्लीतील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपने दिल्लीतील ओखला येथील जल बोर्ड कार्यालयाबाहेर आंदोलन केले. मजेशीर बाब म्हणजे, राष्ट्रीय राजधानीत सध्या सुरू असलेल्या जलसंकटाचा निषेध करणा-या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवा-यांचा वापर केला. भाजप नेते रमेश बिधुरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या प्रकारानंतर सोशल मीडियावर लोक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दिल्ली पोलिसांनी पाण्याचा वापर केल्याचा निषेध व्यक्त केला, सोबतच हे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

घडलेला प्रकार हास्यास्पद
तर श्रीधरण व्ही या एक्स युजरने, त्याऐवजी आंदोलकांना पाण्याची टाकी देता आली असती. त्यांनी पाण्याबद्दल पोलिसांचे आभार मानले असते. असे म्हटले आहे. दुस-या एका वापरकर्त्याने, जलसंकटाच्या वेळी दिल्ली पोलिस भाजपच्या आंदोलकांवर पाण्याच्या फवा-यांचा वापर करत आहेत? हद है! असे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR