जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहर तसेच परिसरामध्ये बुधवारी दि ५ जून रोजी सायंकाळी ४ वाजल्याच्या दरम्यान वादळी वा-यासह अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस झाला, या अर्ध्या तासाचा पावसामुळे शिवारामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते .
जळकोट तालुक्यामध्ये बुधवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये प्रचंड उकाडा होता, दुपारी दोन वाजल्यापासूनच आभाळामध्ये ढगांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती, सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे शिवारातील छटो नाले यावर्षी पहिल्यांदाच भरून वाहिले, शेतीला तलावाचे स्वरूप आले होते. पेरणी जवळ आल्यामुळे अनेक शेतकरी पेरणीपूर्व मशागत शेतात कामे करीत होती मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतक-याची धावपळ उडाली येणा-या दोन दिवसांमध्ये मृग नक्षत्राचे आगमन होणार आहे मृग नक्षत्राच्या काही तास अगोदरच जोरदार पाऊस पडला. मृग नक्षत्रामध्ये असाच पाऊस पडल्यास शेतकरी आपली मूठ चाढ्यावर धरणार आहेत.