20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रजळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना

जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना

आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; अनेकांना उडवलं

जळगाव : प्रतिनिधी
जळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या. मात्र समोरून येणा-या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या भीषण अपघाताने जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव येथील परांडा रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात झाला आहे. येथे पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने चिरडले. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली होती. यानंतर अनेकांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेली माहिती अशी, मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावला. यामुळे अचानक आगीच्या ठिणग्या निघू लागल्या. यामुळे प्रवाशांनी आग लागल्याची भीती व्यक्त केली. यामुळे अनेक प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून खाली उड्या मारल्या. पण समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने अनेकांना चिरडले. या घटनेत सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रवाशांनी दिलेली माहिती अशी, आम्ही पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवास करत होतो, पण रेल्वेला अचानक ब्रेक लावला यावेळी ठिणग्या मोठ्या प्रमाणात उडाल्या. यावेळी प्रवाशांना आग लागली असं वाटले, यामुळे प्रवाशांनी अचानक रेल्वेतून उड्या मारण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्या ट्रकवरुन बंगळुरु एक्सप्रेस गाडी येत होती. या रेल्वेखाली अनेक प्रवाशी चिरडल्याची भीती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR