27.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरजागृति शुगरच्या अध्यक्षा सौ. गौरवी भोसले (देशमुख) यांची वेस्ट इंडीयन शुगर (विस्मा) मिल्सवर संचालक...

जागृति शुगरच्या अध्यक्षा सौ. गौरवी भोसले (देशमुख) यांची वेस्ट इंडीयन शुगर (विस्मा) मिल्सवर संचालक म्हणून निवड

लातूर : प्रतिनिधी
राज्यात खाजगी क्षेत्रातील मराठवाडा व विदर्भात उस उत्पादक शेतक-यांना सर्वाधिक भाव देणा-या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षा तथा कार्यकारी संचालिका सौ गौरवी अतुल भोसले (देशमुख) यांची राज्यातील १३३ खाजगी साखर कारखान्याची शिखर संस्था असलेल्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशीएशन (वीस्मा) पुणे येथील नवीन २०२४ ते २०२७ या नूतन कार्यकारणीत संचालिका म्हणून बहुमताने निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे राज्यातून कौतुक होत आहे.

सौ गौरवी भोसले देशमुख ह्या जागृती शुगर इंडस्ट्रीजच्या अध्यक्षा असून या साखर कारखान्याने शेतक-यांच्या जिवनात आर्थिक क्रांती केली आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी, उदगीर, चाकुर, निलंगा, शिरूर अनंतपाळ जळकोट तसेच शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्यातील अनेक गावातील ऊस उत्पादक शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम या जागृती शुगरमुळे झालेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशीशन (विस्मा) पुणे या कार्यकारिणीवर संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशीएशन पूणे या संस्थेच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल सौ गौरवी अतूल भोसले (देशमुख) यांचे राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांच्या सह जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, मांजरा परिवाराचे माध्यम समन्वयक हरीराम कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR