23.3 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रजातीय सलोखा टिकवणे गरजेचे

जातीय सलोखा टिकवणे गरजेचे

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके यांनीही आता आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ओमराजे निंबाळकर म्हणाले, सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची याचिका आली होती. तेव्हा संसदेत मराठा आरक्षणाची बाजू घेणारा मी एकमेव खासदार होतो. संसदेत मी प्रामाणिकपणे मत मांडले होते. तामिळनाडू राज्यात अशीच परिस्थिती आली होती तेव्हा सरकारने जी पाऊले उचलली होती तीच पाऊलं आता उचलावीत यासाठी मी हा मुद्दा मांडत आहे. समाजाला गरज का आहे हे पटवून दिलं आहे. मी पहिल्या दिवसापासून आरक्षणासाठी पाठपुरावा करत आहे, असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले.

सगळ्याच समाजात जातीय सलोखा असणे ही राज्याची गरज आहे. ही जबाबदारी सरकारची आहे. सरकारने जी आश्वासने दिली आहेत त्याची पूर्तता करण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील झटत आहेत. पण, सगळ्यांनीच जातीय सलोखा टिकवणे गरजेचे आहे, असेही खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.

जनतेने लोकसभेत दाखवून दिले
ज्यांनी पक्ष स्थापन केले त्यांचाच पक्ष नाही असे सांगितले. पक्षातून बेदखल केले, चिन्ह काढून घेतले. निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा प्रकार केला होता. जनतेला गृहीत धरून हा प्रकार केला होता, जनतेने या लोकसभा निकालात याचे उत्तर दिले आहे. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी संघर्ष करण्याची तयारी दाखवली. आता हे सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे श्रेय आहे. आज मी साहेबांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले, असेही खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR