26.1 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeलातूरजिल्हा क्रीडा संकुलात आज योगाभ्यास

जिल्हा क्रीडा संकुलात आज योगाभ्यास

लातूर : प्रतिनिधी
दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज दि. २१ जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करून योगा विषयी प्रचार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यादृष्टीने सर्व संबंधितांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच ग्रापंचायतीपासून ते जिल्हास्तरापर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पतंजलि योगपीठ, प्रजापिता ब्रह्मकुमारी, सुप्रभात ग्रुप, नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आदी संस्थांची यामध्ये सहभाग असणार आहे.
‘योग-स्वयंम और समाज के लिए योग” ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची टॅगलाईन असून या संकल्पनेवर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी ६ वाजल्यापासून विविध कार्यक्रम होणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.आज सकाळी ६ वाजता योगा विषयक जनजागृतीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क  येथून जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.  सकाळी ६.३० पासून जिल्हा क्रीडा संकुल येथे प्राथमिक व्यायाम सुरु होतील. सकाळी ७ ते ७.४५ या कालावधीत प्रत्यक्ष योगाभ्यास होईल, तरी लातूरकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR