20.5 C
Latur
Monday, November 18, 2024
Homeसोलापूरजिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने काळया फिती लावून कामकाज

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने काळया फिती लावून कामकाज

सोलापूर-महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जुनी पेन्शन, वेतन त्रुटी व राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागणीकडे शासनाचे विशेषता ग्रामविकास विभागाचे हेतूता दुर्लक्ष होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने आंदोलनाची सुरुवात म्हणून जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर कर्मचाऱ्यांना काळ्या फिती लावून कामकाज केले.

सर्वात महत्त्वाची मागणी जुनी पेन्शन योजना याकडे तीन महिन्यापूर्वी शासनाने आश्वासन देऊनही अद्याप या योजनेला मूर्त स्वरूप दिलेले नाही त्याचबरोबर वेतन त्रुटी अत्यंत जिव्हाळ्याचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याचबरोबर लिपिकांची पदोन्नतस्तर कमी करणे, सुधारित कर्मचारी आकृतीबंध, पदोन्नतीने रिक्त पदे भरणे, परिचर, वाहन चालक सेवा भरती नियमात दुरुस्ती करणे, अनुकंपामध्ये टक्केवारी वाढवणे, महाराष्ट्र विकास सेवा श्रेणी नियमात दुरुस्ती करावी, परिचर वाहन चालक यांच्या गणवेश धूलाई भता वाढवून द्यावा अशा साधारण ३० प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर काळया फिती लावून जिल्हा परिषद कर्मचारी कामकाज करीत आहेत.

या आंदोलनात जिल्हा परिषदेतील व पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचारी यांनी आंदोलनात अग्रभागाने सहभाग नोंदवला. आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना याविषयी निवेदन देण्यात आले.

शासनाने याबाबतीत याची दखल घेतली नाही तर नऊ ऑगस्ट क्रांती दिनादिवशी दुपारी दीड ते दोन या कालावधीमध्ये निदर्शने कार्यक्रम राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समितीसमोर आयोजित केले आहे. त्यानंतर ही शासनाने दखल न घेतल्यास याबाबत बेमुदत संपाची हाक दिली जाणार आहे.या आंदोलनात जिल्हा परिषद कर्मचारी युनियन राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, विभागीय संघटक डॉ. एस. पी. माने, जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवली, कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरी, सचिव विलास मसलकर, श्रीशैल देशमुख, महिला कार्याध्यक्ष स्वाती स्वामी आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR