14.7 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रजिल्हा बँकेच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ

जिल्हा बँकेच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ

नागपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील चतुर्थश्रेणीच्या १०० आणि क्लरिकल स्टाफच्या १७० जागांसाठी रविवारी राज्यभरातील केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. मात्र, नागपूर येथील जी. एच. रायसोनी वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा सुरू असतानाच संगणक बंद पडल्याने अनेक तरुणांचे पेपर अर्धवट राहिल्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे संतापलेल्या उमेदवारांनी महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला असता, तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांना शांत बसविण्यात आले.

मंगळवारी बाजार येथील जी. एच. रायसोनी कॉमर्स कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर दुपारी साडेतीन नंतर हा प्रकार घडला. वास्तविक, या केंद्रावर दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३० दरम्यान ही परीक्षा होणार होती. दोन तासांच्या या परीक्षेसाठी जवळजवळ ५० ते ७० उमेदवार परीक्षा देणार होते. त्यासाठी उमेदवारांना दुपारी २ पर्यंत केंद्रावर पोचण्याची वेळ देण्यात आली. ठरल्याप्रमाणे विद्यार्थी २ च्या सुमारास परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर दुपारी २.३० वाजता परीक्षा केंद्रात संगणक सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काही विद्यार्थ्यांचे संगणकच सुरू न झाल्याने त्यांना दुस-या रुममध्ये बसविण्यात आले.

दरम्यान, तिथेही परीक्षा सुरू झाल्यानंतर उमेदवार ऑनलाईन पेपर सोडवत असताना अवघ्या काही मिनिटांत संगणक पुन्हा बंद पडले. पेपर अर्थवट राहिल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. केंद्रावरीलअधिका-यांनी त्यांना तांत्रिक बिघाडाचे कारण देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR