25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरजिल्ह्यात अनेक आरोग्य केंद्रात रूग्णकल्याण समित्या कागदावरच

जिल्ह्यात अनेक आरोग्य केंद्रात रूग्णकल्याण समित्या कागदावरच

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील गावागावातील लोकांच्या आरोग्याची काळजी आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यात येते. ना बैठका, ना नियोजन, ना प्रचार, प्रसिद्धी, जनजागृती होत नसल्याने कुठे या समित्या अ‍ॅक्टिव्ह आहेत तर कुठे या समित्या कागदावरच असल्याचे दिसून येते.

दरम्यान, ग्रामीण भागातील ग्रामस्थांना चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीच्या बैठका प्रत्येक महिन्याला होऊन कामकाजाचा आढावा घेणे अपेक्षित असते. मात्र,
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत ४३१ उपकेंद्र कार्यरत असून त्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रांच्या माध्यमातून लोकांना वैद्यकीय सेवा आरोग्य सेवा पुरविण्यात येते.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुग्ण कल्याण समिती धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत समिती असते. या समितीअंतर्गत नियामक मंडळ व केंद्र कार्यकारी मंडळ कार्यरत असतात.नियामक मंडळ धोरणात्मक निर्णय घेते व कार्यकारी मंडळ अंमलबजावणी करते.
रुग्णालयामध्ये प्रत्येक रुग्णास गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, यासाठी द्यावयाच्या सेवांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, रुग्ण कल्याण समितीच्या सर्व निधीचे नियोजन करून निधी विनियोगास मंजुरी देणे.

रुग्णालयाच्या कामकाजाचा व प्रगतीचा आढावा घेणे.असे या समितीचो कार्य असते.सर्व प्राथमिक आरोग्य केंदात बैठका घेतल्या जातात.जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात या समित्या केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांचे कल्याण करणारी समिती गेली कोठे, कारवाई कोण करणार, असे प्रश्न निर्माण झालेले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR