27.5 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रटाइल्स अंगावर पडल्याने मंत्री बच्चू कडू यांच्या पत्नी जखमी

टाइल्स अंगावर पडल्याने मंत्री बच्चू कडू यांच्या पत्नी जखमी

नगर : प्रतिनिधी
आमदार बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांच्या अंगावर मंगल कार्यालयातील पिलरच्या टाइल्स पडल्याने त्या जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्या अकोला जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील एका लग्न समारंभात गेल्या होत्या. यावेळी नयना कडू यांच्या अंगावर मंगल कार्यालयातील पिलरच्या टाइल्स पडल्याने त्या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी मंगल कार्यालयाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष राजेंद्र लंगोटे (रा. थुगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मंगल कार्यालयाच्या संचालकाचे नाव आहे. बेलोरा येथील रहिवासी अनिल विधाते यांच्या मुलीचा लग्नसमारंभ सोमवारी सकाळी चांदूरबाजार येथील माई वच्छलाबाई लंगोटे पॅलेस या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. नयना कडू या लग्न समारंभात सहभागी झाल्या होत्या. लग्न लागत असताना त्या मंगल कार्यालयातील पिलरजवळ बसल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR