लातूर : प्रतिनिधी
येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या एनएसएसचे शिबीर लातूर तालुक्यातील तांदूळजा येथे झाले. शिबिरादरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. या शिबिरात टेलिस्कोपच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरिकांना चंद्र दर्शन घडवण्यात आले. शिबीर कालावधीमध्ये स्वच्छता, आरोग्य, बालविवाह, लोकशाही हक्क याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. परंतु जिथे दयानंद कला महाविद्यालय एखादी गोष्ट करत असते तेव्हा नाविन्यताही तिथेच येतेच जसे की महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग असावा की, एनएसएस कॅम्पमध्ये टेलिस्कोपच्या माध्यमातून चंद्र दर्शन लोकांना घडवून खगोलशास्त्र याविषयी गावकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढवणे, अंधश्रद्धा नहीशि करणे याकरिता दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि देशातील नामवंत शास्त्रज्ञ म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे डॉ. महादेव पंडगे यांना आमंत्रित करुन टेलिस्कोपच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरिकांना चंद्र दर्शन घडवण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी गमतीशीर आणि सोप्या मार्गाने उत्तरे देऊन अनेक भ्रामक कल्पनांची उकल त्यांनी या ठिकाणी केली. गावकरी आणि गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांमध्येही या उपक्रमामुळे खूप उत्साह निर्माण झाला होता त्यांनी या उपक्रमासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिव प्राचार्य आणि एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी यांचे अभिनंदन केले.