लातूर : प्रतिनिधी
कोलकत्ता येथील डॉक्टर वरील झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध नोंदविण्यासाठी येथील प्रा. मोटेगावकर सरांच्या आरसीसी इन्स्टिट्यूटच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला. या मोर्चात मोटेगावकर क्लासेसच्या विद्यार्थिनींचा हजारोंच्या संख्येने सहभाग होता. या मोर्चात आपल्या बहिणीला न्याय द्या, बेटी बचाव, असे फलक घेऊन न्याय द्या, न्याय द्या आपल्या बहिणीला न्याय द्या अशा घोषणा देत विद्यार्थिनींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
आरसीसी कॅम्पस येथून सायंकाळी या मोर्चाला सुरुवात झाली. जयक्रांती महाविद्यालय, औसा रोड मार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. ही रॅली येथून जुने रेल्वे लाईन मार्गे, उद्योग भवन, लातूर अर्बन बँक अशी जात आरसीसी कॅम्पस येथे या कॅण्डल मार्चचा समारोप करण्यात आला. या मोर्चात विद्यार्थीनी सोबतच आरसीसी इन्स्टियूटचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांची देखील उपस्थीती होती.
प्रा. शिवराज मोटेगावकर विद्यार्थ्यांच्या पालकत्वाच्या भूमिकेत
विद्यार्थ्यांचें भवितव्य व सुरक्षिततेसाठी प्रा. मोटेगावकर यांचा नेहमीच पुढाकार असतो. ते विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यसाठी जेवढे अग्रेसर असतात त्यापेक्षा अधिक ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी असतात. विध्यार्थ्यांना ज्ञानदानासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य याबाबतची त्यांची तळमळ नेहमीच दिसून येते. शैक्षणीक पॅटर्न सोबतच आरसीसी म्हणजे विद्यार्थ्यांचे भवितव्य व सुरक्षिततेची १०० टक्के हमी अशी ओळखच संपूर्ण राज्यात निर्माण झाली आहे. यातूनच प्रा. मोटेगावकर यांची विद्यार्थ्यांविषयी असलेली तळमळ नेहमीच दिसून येते. प्रा. मोटेगावकर नेहमीच पालकांच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांची काळजी घेत असल्याने आरसीसी मधील प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या सुरक्षिततेची हमी वाटते. आरसीसीच्या या विश्वासार्हतेमुळे पालक देखील निश्चित राहतात. लातूरचे शैक्षणीक पॅटर्न निर्माण करण्यात प्रा. शिवराज मोटेगावकर यांचा मोलाचा वाटा आहे.