30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeलातूरडॉ. उमाकांत जाधव यांचा उदगीर पालिकेने केला गौरव

डॉ. उमाकांत जाधव यांचा उदगीर पालिकेने केला गौरव

लातूर : प्रतिनिधी
कोविड-१९ या काळात सामाजिक बांधिलकी जोपासताना कोरोनातून बरे झालेल्या रक्त्तदात्यांना प्रोत्साहित करुन कोविड प्लाज्माचे रक्तदान करण्यास प्रेरणा देणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच लातूरच्या माऊली ब्लड बँकेचे संस्थापक डॉ. उमाकांत जाधव यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त उदगीर नगरपालिकेच्या वतीने दि. २६ जानेवारी रोजी उदगीर नगरपालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी  सुंदर बोंदर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
उदगीर शहरात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक होती. तसेच बरे होण्याची संख्याही जास्त होती. दरम्यान, त्यावेळी मराठवाड्यातील कोविड प्लाज्मा रक्त्तदानाचा प्रयोग डॉ. उमाकांत जाधव यांच्या पुढाकाराने झाला. कोविड रुग्णांसाठी जीवदान ठरावे, अशा स्वरुपाचे रक्त्तदान घडवून आणण्याचे सामाजिक कार्य डॉ. उमाकांत जाधव यांनी केले. तसेच कोरोना काळात रक्त्तदानाची भीती दूर करताना स्वत: रकदान करुन प्लाज्मा दान करुन रक्तदात्यांना प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले. याची दखल घेत उदगीर नगरपालिकेच्यावतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उदगीर शहरातील अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते.
फोटो: १०

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR