23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeनांदेडडॉ.धनंजय कहाळेकर यांना पीएच.डी.

डॉ.धनंजय कहाळेकर यांना पीएच.डी.

नांदेड : प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील कहाळा येथील रहिवासी डॉ.धनंजय निळकंठ महाराज कहाळेकर यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. यासाठी त्यांना डॉ.विश्वास गोगटे यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ.धनंजय कहाळेकर यांनी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयुर्वेद शाखेत कायाचिकित्सा विषयात सारांशाने  ‘वयोमानानुसार संभाव्य आजार व शारीरिक बदल थांबवण्यासाठी आयुर्वेदिक औषधोपचार’ या विषयावर संशोधन प्रबंध पूर्ण केला. यासाठी डॉ.कहाळेकर यांना नांदेडच्या आयुर्वेद महाविद्यालयातील डॉ.विश्वास गोगटे यांचे मार्गदर्शन लाभले.

सद्यस्थितीत डॉ.कहाळेकर हे वसमत तालुक्यातील हट्टा येथील सौ.शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्रात कायाचिकित्सा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.  डॉ.कहाळेकर यांच्या संशोधन कार्यात नांदेडच्या आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.यशवंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ.धनंजय कहाळेकर यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR