25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी विहार स्मारकाच्या दुसऱ्या टप्यातील प्रस्ताव शासनास पाठवलेच नाहीत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी विहार स्मारकाच्या दुसऱ्या टप्यातील प्रस्ताव शासनास पाठवलेच नाहीत

सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आज अखेर महामानव डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या सांगोला येथील कोळे गावातील स्मारकाच्या कामासाठी निधी मिळू शकला नाही. जिल्हा परिषद प्रशासन जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांचा अनादर करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद माजी सदस्य सचिन देशमुख यांनी केला आहे.

कोळे ता. सांगोला येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असून यासाठी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या सेस फंडातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी विहार स्मारकासाठी आज अखेर १.६० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च होवून पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले आहे. उर्वरित निधीअस्थी विहार स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्मारकाच्या पुढील टप्प्यातील काम पूर्ण होण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना परिपूर्ण प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्याबाबत तोंडी आदेश दिले होते.

परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्या टप्यातील निधी बाबत देशमुख यांनी वैयक्तिक स्मारक समितीच्या वतीने निवेदन दिले असता जिल्हा परिषदेकडून निधीसाठी परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे आला नसल्याची माहिती त्यांच्या समोर आली. त्यामुळे फक्त जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आज अखेर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामासाठी निधी मिळालेला नाही अशी खंत देशमुख यांनी बोलून दाखवली.

जिल्हा परिषद च्या सामान्य विकासाला पैसे न देता गरज नसताना मुख्यालयाच्या सुशोभीकरणावर जनतेचा करोडो रुपये चूराडा सीईओ करत आहेत असेमाजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR