24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रतरुणीवर सामूहिक अत्याचार

तरुणीवर सामूहिक अत्याचार

अमरावती : प्रतिनिधी
दिवाळीच्या उत्सवामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीवर दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने फक्त अमरावतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

दिवाळीच्या उत्सवामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने फक्त अमरावतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईचा राग आल्यामुळे घराबाहेर पडलेल्या तरुणीवर गँगरेप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गाडगे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी बुधवारी अज्ञात आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यात पाच आरोपींना आतापर्यंत अटक झाली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि कार जप्त करण्यात आली आहे.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून २९ सप्टेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास आईसोबत किरकोळ भांडण झाल्याने घराबाहेर पडली. पीडित रागाच्या भरात घरातून निघून गेल्यानंतर ही युवती पाच युवकांच्या संपर्कात आली असून या पाचही युवकांनी युवतीला दारू पाजून तिच्यावर नांदगाव पेठ परिसरात सामूहिक बलात्कार केल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या घटनेमुळे अमरावती शहर हादरले असून संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR