36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजनतापसी पन्नू लवकरच विवाहबंधनात

तापसी पन्नू लवकरच विवाहबंधनात

मुंबई : साऊथ-बॉलिवूड चित्रपटात आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण करणारी अभिनेत्री तापसी पन्नू लग्नासाठी सज्ज झाली आहे, ती लवकरच तिचा प्रियकर मथियास बोसोबत लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. आता तापसी पन्नूनेही प्रियकर मथियास बो याच्याशी मार्चच्या अखेरीस लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे ऐकायला मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तापसी पन्नू तिचा बॉयफ्रेंड आणि बॅडमिंटनपटू मथियास बोशी लग्न करणार आहे, दोघेही मागील १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांचाही लग्न सोहळा मार्चच्या अखेरीस उदयपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे. विवाह सोहळ्याला कोणत्याही बॉलिवूड स्टारला आमंत्रित केले जाणार नाही, असेही सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR