23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeराष्ट्रीयतामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, ४ जणांचा मृत्यू

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, ४ जणांचा मृत्यू

विरुधूनगर : तामिळनाडूतील विरुधूनगर जिल्ह्यातील सत्तूरजवळ एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती विरुधूनगरच्या जिल्हाधिका-यांनी दिली.

या दुर्घटनेत सुरुवातीला तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील एका जखमीचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४ वर गेली असल्याचे जिल्हााधिका-यांनी सांगितले.

स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक अधिका-यांनी स्फोटाचे कारण शोधण्यासाठी आणि कारखान्यात असलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे मूल्यांकन करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR