27.5 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रतिहेरी हत्याकांडानंतर नागभीड तालुका पुन्हा हादरला

तिहेरी हत्याकांडानंतर नागभीड तालुका पुन्हा हादरला

जादूटोणाच्या संशयातून वृद्धाची हत्या

चंद्रपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात जादूटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आसाराम दोनाडकर (वय ६७) असे मृत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान ३ महिन्यांपूर्वी याच गावात एकाने स्वत:च्या दोन मुलींसह पत्नीची कु-हाडीने हत्या केल्याचा प्रकार घडला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव चाल करून गेला. जादूटोणा करतो म्हणून त्यांच्याशी जमावाने वाद घातला. दोनाडकर यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण देखील झाली.

ही मारहाण ते बेशुद्ध होईपर्यंत झाली. काहींनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी संतोष जयघोष मैंद (वय २६), श्रीकांत जयघोष मैंद (वय २४), रुपेश देशमुख (वय ३२) या संशयितांना अटक केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR