23 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरतुळजापुरातील महिलेवर लातुरात बलात्कार

तुळजापुरातील महिलेवर लातुरात बलात्कार

लातूर : प्रतिनिधी
काही दिवसांपुर्वी प्रवासदरम्यान तुळजापूर बसस्थानकात ओळख झालेल्या महिलेला दि. १६ सप्टेंबर रोजी लातूरात बोलावून घेऊन लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पांढ-या रंगाच्या कारमध्ये बसवून पिडीत महिलेला नांदेड रोडवर घेऊन जात कारमध्येच बळजबरीने व त्यानंतर नांदेड रोडवरील कोळपा परिसरातील मेजेस्टीक लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन एका संशयीत शिक्षकासह कारमधील तिघांवरोधात स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर बसस्थानक येथे काही दिवसांपुर्वी तुळजापूर येथील एका महिलेची एका संशयीत शिक्षकाची ओळख झाली होती. यावेळी सदरील पिडीत महिलेने चर्चेदरम्यान सदरील संशयीत शिक्षकाकडे माझ्यासाठी काही काम आहे का पहा, असे सांगीतले होते. सदरील संशयीत शिक्षकाने सदरील महिलेला दि. १५ सप्टेंबर रोजी फोन करुन तुमच्यासाठी काम आहे. लातूरला या म्हणून लातूरात दि. १६ सप्टेंबर रोजी बोलावून  घेतले.
दि. १६ सप्टेंबर रोजी सदरील पिडीत महिला लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचल्यानंतर त्या संशयीत शिक्षकाने अगोदरच चालकासह इतर दोघे जण बसलेल्या कारमध्ये सदरील पिडीत महिलेसह स्वत: कारमध्ये बसत कार चालकास कार नांदेड रोडला घेण्यास सांगितले.  कार नांदेड रोडवर पोहचताच काही अंतरावर कार रस्त्याच्या कडेला थांबवून चौघा पैकी दोघांनी कारमध्येच झोंबाझोंबी करुन जबरदस्तीने पिडीत महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर सदरील पिडीत महिलेला कोळपा परिसरात महामार्गाला लागून असलेल्या मॅजेस्टीक लॉजमध्ये नेऊन तीच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडल.
याप्रकरणी सदरील पिडीत महिलेन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन झालेला प्रकार पोलीसांना सांगितल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी पिडीत महिलेचा जबाब नोंदवून घेत तो स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग  केला.  या जबाबावरुन संशयीत शिक्षकासह कारमधील इतर तिघा विरोधात स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि मुळे हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR