21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूर‘तो’आदेश तीन वर्षांपासून कागदावरच!

‘तो’आदेश तीन वर्षांपासून कागदावरच!

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुमपान करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी तीनवर्षांपुर्वी जानेवारी महिन्यात जारी केला होता. मात्र हा आदेश गेल्या तीन वर्षांत कागदावरच राहिला. ना दंड, ना शिक्षा. कारवाईच होत नसल्यामुळे बिनधिकतपणे सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे धुम्रपान केले जात असल्याचे पहावयास मिळत आहे. पोलीस दलाच्या वतीने रविवारी ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. ही धाव व्यसनमुक्त करेल काय?, हा भाग वेगळा पण आता विद्यमान जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घूगे यांनी सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखु खाऊन थुंकण्यास प्रतिबंध करणारा आदेश नव्याने काढून त्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्याचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

तीन वर्षांपुर्वी सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकिय कार्यालय, कार्यालयीन परिसर, शासकीय व खाजगी आस्थापना, सर्व सार्वजनिक ठिकाणे तसेच शासकिय व खाजगी शैक्षणिक संस्था तंबाखूमक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनिमय आणि जाणिज्य उत्पादन, पुरवठा आणि वितरण अधिनियम २००३ मधील कलम ४ च्या तरतुदीनुसार धुम्रपान करण्यास किंवा तंबाखू खावून थूंकण्यास मनाई आदेश गतवर्षी जारी केले होते. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी, आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल व सदरील कार्यक्रमाबाबत समन्वय ठेवण्यासाठी आपल्या अधिनस्त एका जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करुन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच दंड वसुलीची रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीत कोषागारात ०२१००६७२०१ या लेखाशिर्ष सांकेतांकमध्ये जम करावी, असे ही आदेशात नमुद केले आहे. मात्र याविषयी गेल्या तीन वर्षांत याविषयी फारसे काही झाल्याचे दिसून येत नाही.

मराठवाड्यात सर्वाधिक पानटप-या लातूर शहरात आहेत, असे सांगीतले जाते. शहरातील प्रत्येक रस्त्यावर, चौकात, गल्लीबोळात असलेल्या पानटप-या पाहता कदाचित हे खरेही असू शकेल. परंतु व्यसनाची ठिकाणे सर्वाधिक असणे यात कसला मोठेपणा. पुर्वी शहरात पानटप-या होत्या. त्या साध्या सरळ-सरळ तंबाखु, सुपारी, गुटखा विक्री करणा-या होत्या. आता शहरात ऐसपैस मोठ्या पानटप-या दिसून येत आहेत. पानटपरीच्या कोप-यातच एक पडदा सोडलेला असतो. व्हीआयपी कक्ष असावा, असे कक्ष म्हणजे सिगारेट झोन होय. या सिगारेट झोनमध्ये शाळा, महाविद्यालयातील तरुण मुलं विविध प्रकारच्या सिगारेटचे झुरके मारत बसलेली असतात. हे चित्र प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या आणि शहरातील चौका-चौकातही पहावयास मिळते. यावर कोणाचेही प्रतिबंध नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR