17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रथोरातांना पोस्टल मते ७० टक्के, ईव्हीएम मध्ये मागे कसे?; ठाकरे गटाने मांडले प्रेझेंटेशन

थोरातांना पोस्टल मते ७० टक्के, ईव्हीएम मध्ये मागे कसे?; ठाकरे गटाने मांडले प्रेझेंटेशन

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाली. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर आरोप केले जात आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमधील ट्रेंड इतका कसा बदलला? असा सवाल उपस्थित करत धक्कादायक आकडेवारीच मांडली आहे. तसेच व्हीव्हीपॅट मतमोजणीची मागणी देखील त्यांनी केली आहे.

ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेत वरूण सरदेसाई म्हणाले की, विधानसभेचा निकाल लागला. पण, त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीत. विरोधी पक्षातील अनेक उमेदवारांना सम-समान आकडेवारी पाहायला मिळाली. एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे पोस्टल आणि बॅलेट मतदान. पोस्टल, बॅलेट मतदान हे ट्रेंडचे रिप्रेझेंटेशन असते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मविआचा ३१ जागांवर लीड होते तर १६ जागांवर महायुतीला लिड होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडी १४३ जागांवर लीडवर आहे. तर महायुती १४० जागांवर आघाडीवर आहे. तर ईव्हीएमच्या आकडेवारीत १४३ वर महायुती तर ४६ जागांवर महाविकास आघाडीला लीड आली आहे, असे त्यांनी म्हटले.

पोस्टलमध्ये महायुतीपेक्षा मविआचे उमेदवार पुढे
ते पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना ५१ टक्के मते पोस्टलमध्ये मिळाली. ३० टक्के मतं मिलिंद देवरा यांना मिळाली. आदित्य ठाकरे २१ टक्क्यांनी पुढे होते. महाविकास आघाडीच्या जवळपास अनेक उमेदवार हे पोस्टलमध्ये महायुतीच्या उमेदवारापेक्षा मोठ्या फरकाने पुढे आहेत. तर ईव्हीएम मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार महायुती उमेदवाराच्या एकदम मागे गेलेत.

‘ईव्हीएम’ मतमोजणीत महायुती आघाडीवर
हे सगळे आकडे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरून घेतले आहे. पोस्टल टू ईव्हीएम मतं आमची कुठेच कशी वाढली नाहीत? यामध्ये अनेक सीट्स आम्ही हरलो तर काही सीट्स आम्ही जिंकलो. ३५ ते ४० मतदार संघाचे टेबल स्वत: तयार केले आहेत. मला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचा होता हा ट्रेंड कसा काय येतो? पोस्टलमध्ये महाविकास आघाडी १४३ जागांवर पुढे होती तर १४० जागांवर महायुती होती तर मग ईव्हीएम मतमोजणी सुरु होते तेव्हा ४६ जागावर महाविकास आघाडीने आघाडी घेतली तर २३० जागांवर महायुती आघाडीवर कशी आली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

‘व्हीव्हीपॅट’ची मतमोजणी झाली पाहिजे
एवढी मोठी तफावत कशी आली? लोकसभेचा ट्रेंड बघा तो ट्रेंड का बदलला? या आकडेवारीचा अभ्यास केला तर एकच दिसत आहे की, पोस्टलमध्ये आम्ही पुढे असताना र्शींा मध्ये ५ ते १५ टक्क्यांनी मागे गेलो, यातच गोंधळ झाला आहे. ‘व्हीव्हीपॅट’ची मतमोजणी करण्यासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले असताना अनेक ठिकाणी असा सांगितलं जातंय की आम्ही मॉक पोल कन दाखवणार आहोत. आमची मागणी आहे की, ‘व्हीव्हीपॅट’ची मतमोजणी झाली पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR