25.4 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeलातूरदसरा महोत्सवनिमित्त बाभळगावातील रामलीला कथेचा वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते होणार शुभारंभ

दसरा महोत्सवनिमित्त बाभळगावातील रामलीला कथेचा वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते होणार शुभारंभ

लातूर : प्रतिनिधी
दसरा महोत्सवानिमित्त बाभळगाव येथे आयोजित रामलीला कथेला शुभारंभ आज दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्वामी श्री भुवनेश्वर वशीष्ठजी महाराज यांच्या मंत्रमुग्ध करणा-या वाणीत बाभळगाव येथे दसरा महोत्सवानिमित्त नवरात्र महोत्सव समिती, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, तंटामुक्ती ग्राम समिती व ग्रामस्थ बाभळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रामलीला कथेस गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी श्री व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, मैदान, बाभळगाव येथे प्रारंभ होणार आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते गुरुवार दि. ३ आँक्टोबर रोजी सायंकाळी श्री व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, मैदान, बाभळगाव येथे होणा-या रामलीललेत पहील्या दिवशी श्री गणेश पुजन, श्री हनुमान पुजन, नारदमोहभंग संपन्न होऊन ही रामलीला शनिवार दि. १२ आँक्टोंबर रोजी मेघनाथ वध, रावण वध, भरत भेट, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम राज्याभिषेक सादर करुन संपणार आहे.
श्री भुवनेश्वर वशीष्ठजी महाराज रामलीला सादर करणार येणार आहेत, यामध्ये ३० पेक्षा अधिक कलावंत आहेत. स्वामी भुवनेश्वर वशीष्ठजी यांची रामलीला केवळ एक कथा नाही, तर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी एक आध्यात्मिक यात्रा आहे. या रामलीला कार्यक्रमाचा सर्व भावीक भक्त्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष नवरात्र महोत्सव समिती बाभळगाव, अध्यक्ष, नवरात्र महोत्सव समिती, बाभळगाव जीवनराव गुंडेराव देशमुख, ग्रामपंचायत सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसरंपचं गोविंद देशमुख, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन महादेव गंगाराम जटाळ, व्हाईस चेअरमन शिवाजी आप्पाराव जाधव, तंटामुक्त्ती समितीचे अध्यक्ष शिवराज नागोराव देशमुख व ग्रामस्थ बाभळगाव वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR