लातूर : प्रतिनिधी
यावर्षी पाऊस व पेरण्या वेळेत झाल्या आहेत शेतकरी शेतीच्या पीकाच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. अशातच राज्यशासनाने माझी लाडकी बहीण योजना आमलात आणली आहे. लाडक्याताईने योजनेच्या कागदपत्राची जुहवाजुळव करून वेळेत शासनाकडे जमाकरण्याचा तगादा लावला आहे. या गोंधळात ब-याच दाजींचा पीक विमा भरण्याचा राहून गेला आहे. तेंव्हा दाजी पीक विमा भरण्यासाठीचा आजचा दिवस शेवटचा दिवस आहे विमा भरून घ्या, विमा भरून घेण्यास टाळाटाह करीत असेल तशी तक्रार करीत असेल तर संबधित विभागाकडे तशी तक्रार करा असे आवाहन ही संबकधत विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत दरमहा १५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचे ठरले आहे. त्याबाबतीत सध्या महिलांनी सीएससी केंद्र वर व महाईसेवा सेवा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. तसेच याकामी दाजीला ही कामाला लावले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या नादात दाजी पिक विमा भरायचा राहून जायचा आज पिक विम भरण्यासाठीचा आजचा दिवस आहे. ज्यांचा कोणाचा विमा भरण्याचा रायला आहे त्यांना तो आज भरून घ्यावा लागणार आहे.
शासनाने जून २०२३ पासून राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना लागू केली आहे. त्यामुळे शेतक-यांना प्रति अर्ज केवळ १ रुपया भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होता येत आहे. कपभर चहा पाणी, बीडीकाडीसाठी ५ ते २० रुपये खर्च करावे लागतात. त्यापेक्षाही स्वस्त रकमेत खरीप हंगामाचा विमा भरता येत आहे. त्यामुळे खरीप हंगाम २०२४ मध्ये पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी १५ जुलै मुदत देण्यात आली आहे. अधिसूचित केलेल्या पिकांचा विमा शेतक-यांना भरता येत आहे. शेतक-यांना केवळ १ रुपया भरून या योजनेत सहभागी होता येत आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय पोर्टलवर स्वत: शेतक-यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र अर्थात सीएससी मार्फत अर्ज करता येत आहे.
परंतु काही सीएससी धारक शेतक-यांना अतिरिक्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत. तथापि सीएसएसी केंद्र चालकांना पिक विमा अर्ज भरण्यासाठी प्रति अर्ज ४० रुपये अदा केले जात आहेत. त्यामुळे जादा पैसे घेत जात असतील तर संबंधित शेतक-यांने टोल फ्री क्रमांक टोल फ्री क्रमांक १४४११ / १८००१८००४१७ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ९०८२९२१९४८ या व्हाट्सअप वर तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अथवा प्रत्यक्ष संपर्क साधून तक्रार करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.