लातूर : प्रतिनिधी
दिलासा फाऊंडेशन लातूरंच्या वतीने भालचंद्र ब्लडबँक लातूर येथे निमंत्रितांचे कविसंमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या अघ्यक्षपदी विंश्वभर वराट हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून दिलासा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बिराजदार, दिलीप लोभे, यशवंत मस्के हे उपस्थित होते.
या संमेलनात सुरेश गीर यांच्या ‘सागर’ या कवितेने दादा मिळवली. ‘उरले नाही दु:ख कोणतेही जे मला रडवू शकेल! अग्नीत जोर कुठे? जळून खाक राखेला पेटवू शकेल कवितेने दाद मिळविली. नरसिंग इंगळे चिकलठाणा यांनी ‘गोटया आणि इटी-दांडूचा मोडून गेला डाव’ ‘शहरात हरवले गाव त्याचे नाही राहिले नाव’ जोश लातूरी यांनी मराठीचे महत्त्व सांगणारी गझल सादर करून उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला\ तर प्रिया कौलवार पंढरपूर यांची गझल भाव खाऊन गेली, प्रा. गोविंद जाधव यांची आता भुईवर, उरली ना ओल, पाताळ ही खोल, कोरडेच’ या कवितेने पर्यावरणाची स्थिती मांडली. कवी डॉं. निलेश नागरगोजे मेंदू विकारतज्ञ, सतिश हाणेगावे औराद शहा, सुलक्षणा सोनवणे, संगिता कासार, तहसिन सय्यद, विशाल अंधारे, प्रा. गोविंद जाधव, राजेंद्र माळी, प्रा. नयन राजमाने, शैलैजा कारंडे, ईस्माईल शेख, प्रदीप कांबळे, इंदूमती कदम गंगाखेड, शामल क्षीरसागर, सविता धर्माधिकारी, अर्चना बोंडगे यांच्याही रचना अप्रतिम होत्या.
अध्यक्षीय मनोगत वराट यांनी व्यक्त केले. त्यांनी लक्षवेधी कविता सादर केली. प्रास्ताविक प्रमोद जाधव यांनी केले तर सुत्रसंचालन सुप्रिया दापके, जना घुले, वंदना केंद्रे यांनी केले. आभार सत्यशिला कलशेट्टीने मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष दयानंद बिराजदार, उपाध्यक्ष दिलीप लोभे, सचिव यशवंत मस्के, कोषाध्यक्ष प्रमोद जाधव, सत्यशिला कलशेट्टी, मोहन सावंत, महारुद्र डिगे, विनोद जाधव, कोमल आचार्य, सरस्वती बिराजदार, शिवाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.