19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरदिवाळीपूर्वी लातूर शहर स्वच्छ, सुंदर बनवावे

दिवाळीपूर्वी लातूर शहर स्वच्छ, सुंदर बनवावे

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी नवीन एजन्सी आली आहे. दिवाळीपुर्वी संपूर्ण शहर स्वच्छ, सुंदर करावे, नव्याने मंजूर झालेल्या सर्व योजनांची कामे दर्जेदार पध्दतीने वेळेत पूर्ण करावीत शहर वाहतुकीला शिस्त लावावी, सीटी बसमधील महीलांसाठी मोफत बस प्रवास योजना सुरुच ठेवावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर सर्वकक्ष विकास अराखडा तयार करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळयाची उभारणी करावी आदी सुचना, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १४ ऑक्टोबर रोजी सांयकाळी लातूर शहर महानगरपालीका आढावा बैठकी दरम्यान दिले आहेत. सोमवारी सांयकाळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालीका कार्यालयात जाऊन शहरातील विविध विकास योजनांच्या संदर्भाने आढावा बैठक घेतली. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे सर्व विभाग प्रमुख व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
मागच्या काळात लातूर शहरातील कचरा व्यवस्थापना बाबत अनेक तक्रारी होत्या. आता नव्या एजन्सिला हे काम दिले असून ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलण्याचे काम सुरु झाले आहे. शहरातील सव्वा लाख घरावर क्युआर कोड स्कॅनर बसवीले असून याद्वारे घंटागाडीची नियमतता तपासली जाणार आहे. कालच या सुवीधेचा शुभारंभ माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केला आहे. कचरा व्यवस्थापन अत्यंत प्रभावी आणि पारदर्शक पध्दतीने करण्यात यावे, असे निर्देश या बैठकी दरम्यान त्यांनी दिले.
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावावी. फेरीवाला धोरणाचा नव्याने आढावा घेऊन त्यांची ताबडतोब अंमलबजावणी करावी. शहरात चार दिवसाला नियमीत स्वच्छ पाणीपुरवठा करावा. पटेल चौकातील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या १८९ खाटाच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागे बाबत त्वरीत कार्यवाही करावी, नव्याने शहरात मंजूर केलेल्या विकासयोजना दर्जेदार पध्दतीने वेळेत पूर्ण कराव्यात, निवडणूक कालवधी असला तरी विकासकामे सुरुच ठेवावीत. मांजरा धरणावरुन येणा-या समांतर पाईपलाईनचे व भुमिगत गटार योजनेचे काम लवकरात लवकर सुरू करावे, लिंगायत, गोसावी, वैदू समाजासाठी स्मशानभुमीचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा आदी सुचना यावेळी देण्यात आल्या.
शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर उभा करावयाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळा उभारणी संदर्भात सद्य:स्थितीची माहीती घेऊन संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वकक्ष विकास अराखडा तयार करण्याच्या सुचना आमदार देयामुख यांनी दिल्या. या परीसरात असलेले हुतात्मा स्मारक, महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा, व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, संविधान स्तंभ, ग्रंथालय, उद्यान या सर्व गोष्टीचा या अराखडायात समावेश करावा या मैदानावर पून्हा पाणी साचणार नाही यांचेही नियोजन करावे, चांगल्या वास्तुवीशारदकडून हा अराखडा बनवून घ्यावा आदी सुचना यावेळी आमदार देशमुख यांनी दिल्या आहेत. या बैठकीदरम्यान मनपा आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे व त्यांच्या सहका-यांनी शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी लातूर मनपात नव्याने रुजू झालेले व पदोन्नती झालेल्या अधिका-यांचा माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR