24.1 C
Latur
Monday, June 24, 2024
Homeक्रीडादीप्ती जीवनजीला सुवर्णपदक

दीप्ती जीवनजीला सुवर्णपदक

नवी दिल्ली : भारताच्या दीप्ती जीवनजीने जागतिक स्तरावर कमाल करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तिने जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये सुवर्ण ज्ािंकण्यात यश मिळवले. दीप्ती जीवनजीने टी-२० मध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रम नोंदवला. ४०० मीटरचे अंतर अवघ्या ५५.०७ सेकंदात गाठले. यासह भारताच्या दीप्तीने अमेरिकन अ‍ॅथलीट ब्रेना क्लार्कचा विक्रम मोडला. यापूर्वी अमेरिकेच्या ब्रेना क्लार्कने पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५५.१२ सेकंदांत ४०० मीटर अंतर गाठले होते. पण, भारताच्या दीप्तीने हा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. तुर्कीच्या आयसेल ओंडरने ५५.१९ सेकंदात शर्यत पूर्ण केल्याने तिला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR