23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरदुचाकी-ट्रॅक्टर अपघातात दोन जीवलग मित्रांचा मृत्यू

दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात दोन जीवलग मित्रांचा मृत्यू

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील मेवापूर येथील दोन जीवलग मित्रांचा दुचाकी व ट्रॅक्टर अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील घोणसी येथे दि २९ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता घडली .
जळकोट तालुक्यातील  मेवापूर येथील सुनील लक्ष्मण राठोड (वय -२५ ) व भरत निळकंठ गोपनर (वय  २६ ) हे दोघे जीवलग मित्र दि २९ ऑगस्ट रोजी काही कामानिमित्त आपल्यादुचाकीवर लातूर येथे गेले होते. लातूर येथील काम आटोपून ते उदगीर मार्गे गावाकडे परत निघाले असता जळकोट ते बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास वर घोणसी या गावाजवळ त्यांची दुचाकी ट्रॅक्टरला धडकली. यामध्ये भरत गोपनर यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनील राठोड हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उदगीर येथील सरकारी रुग्णालया दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला . दरम्यान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व पोलीस कॉन्स्टेबल राहुल वडारे यांनी घटनास्थळी भेट दिली
  सुनील राठोड आणि भरत गोपनर हे दोघेही जीवलग मित्र होते ते दोघेही एकत्र काम करीत होते , मजुरी करून ते आपली उपजीविका भागवत असत.  मयत सुनील राठोड यांना दहा दिवसांपूर्वीच मुलगा झाला होता. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा मुलगी असा परिवार आहे तर भरत गोपनर यांच्या पश्चात एक वर्षाचा मुलगा पत्नी आई-वडील असा परिवार आहे. सुनील राठोड आणि भरत गोपनर यांच्या निधनाने संपूर्ण मेवापूर गावावर शोककळा पसरली आहे. उदगीर येथील सरकारी रुग्णालयात दोघांचेही शवविच्छेदन करण्यात आले.  शोकाकुल वातावरणामध्ये मेवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातामधील ट्रॅक्टर चालकावर जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR