18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeसोलापूरदुहेरी जलवाहिनीबाबत आ. कोठेंनी केली आयुक्तांशी चर्चा

दुहेरी जलवाहिनीबाबत आ. कोठेंनी केली आयुक्तांशी चर्चा

सोलापूर- भाजपाचे आ. देवेंद्र कोठे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांची भेट घेऊन शहर विकासाबाबत विविध विषयांवर चर्चा केली.

शहर मध्य विधानसभेचे आमदार झाल्यापासून आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रथमच सोलापूर म हानगरपालिकेला भेट देत महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर पाणीपुरवठ्यासाठी वरदान ठरणाऱ्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या पूर्णत्वाबाचत सविस्तर चर्चा केली. दुहेरी जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले तर शहराच्या पाण्याचा मोठा प्रश्न संपणार आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना दिल्या.

स्मार्ट सिटीची कामे, शहरातील कचरा, पाणी व्यवस्थापन, विद्युत व्यवस्थापन, स्वच्छता आदी विषयांवर उपाय योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी भाजपाचे माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशी घोषणा केली आहे. त्यांचा विकासाचा महासंकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही योगदान देण्यास कटीबद्ध असून सोलापूरही आता विकासाच्या बाबतीत थांबणार नाही हे वचन आम्ही सोलापूरकरांना देत आहोत, असे आ. देवेंद्र कोठे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR