25 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रदूध दरवाढीवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

दूध दरवाढीवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. दूध दरवाढ, पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा यावरून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. जीएसटी कॉन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या वतीने कोण गेले होते? महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी याचा विरोध का केला नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच पुढे ढकलण्यात आलेल्या नीटच्या परीक्षेवरून देखील त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

जीएसटी कॉन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या वतीने कोण गेले होते? महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी याचा विरोध का केला नाही? आम्ही जेव्हा याबद्दल केंद्रात विचारतो तेव्हा आम्हाला राज्यातील लोक इथे येतात असे सांगतात. महाराष्ट्र सरकार जीएसटी कॉन्सिलमध्ये काय करत होते, हे होऊच कसे दिले, लहान मुलांनी आता दूध प्यायचे नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, त्यावरून देखील जोरदार निशाणा साधला. नीटच्या परीक्षेमध्ये सातत्याने घोळ होत आहे. मी एसआयटीची मागणी केली आहे. संसदेत पहिला शेतकरी प्रश्न, नीटची परीक्षा आणि आरक्षणाचा विषय यावरच आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR