23.9 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूरदेवणी तालुक्यात घरोघरी दिवाळी

देवणी तालुक्यात घरोघरी दिवाळी

देवणी : प्रतिनिधी
देवणी तालुक्यात आयोध्यापती श्रीराम  प्राणप्रतिष्ठापनासोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात येऊन तालुक्यात बोरोळ व वलांडी परिसरात दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आली.  दि. २२ जानेवारी २०२४ रोजी  प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त वलांडी येथील श्रीराम  मंदिर  यांच्यावतीने प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. पूजनानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच वलांडी येथील शिवाजी चौक ते श्रीराम मंदिर  पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
तालुक्यातील देवणी, बोरोळ सह अनेक गावांमध्ये प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  देवणी तालुक्यात नागरिकांनी घरी तसेच आपल्या आस्थापनामध्ये दुकाने शोरूम मध्ये धार्मिक उपक्रम आयोजित केले होते.  कुठे प्रभू श्रीरामाची पूजा अर्चना तर कुठे महाआरती, तर कुठे महाप्रसादाचे वितरण तर कुठे दव्यिांची आरस असे विविध उपक्रम नागरिकांनी आयोजित केले. संपूर्ण तालुक्यात दिवाळी सारखे वातावरण पाहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR