19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeउद्योगदेशातील पहिली इलेक्ट्रिक एलिवेटेड बस नागपुरात!

देशातील पहिली इलेक्ट्रिक एलिवेटेड बस नागपुरात!

नागपूर : वृत्तसंस्था
देशातील पहिली विजेवर चालणारी एलिवेटेड बस सेवा नागपुरात सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरातील रिंग रोडवर पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत ही खास बस सेवा चालवली जाईल. त्यासाठी टाटा आणि स्कोडा या नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून ही खास बस तयार केली जात असून ती बस १८ मीटर लांब राहणार आहे. या खास बसमध्ये प्रवाशांना विमानासारख्या सर्व सोयी उपलब्ध राहील, असे ही गडकरी म्हणाले.

विशेष म्हणजे एसटी किंवा महापालिकेकडून डिझेलवर चालवल्या जाणा-या बस सेवेपेक्षा विजेवर चालणा-या या बस सेवेचे दर ३० टक्क्यांनी कमी राहतील. असा दावा ही गडकरींनी केला. एलिव्हेटेड मार्गावर विजेवर चालणा-या बस सेवेचा हा देशातील पहिलाच प्रयोग राहील आणि त्याची अंमलबजावणी नागपुरातील अत्यंत वर्दळीच्या रिंग रोडवर ५० किलोमीटर अंतरापर्यंत केली जाईल अशी माहिती ही नितीन गडकरींनी दिली. आज नागपुरात नैसर्गिक शेती या पुस्तकाचे विमोचन गडकरी यांच्या हस्ते झाले असून अ‍ॅग्रो व्हिजन शेतकरी भवनाचे भूमिपूजनही पार पडले.

देशाचा शेतकरी एक दिवस इंधन उत्पादन करेल, विमानांना उडवण्यासाठी लागणारे एअर फ्युल तयार करेल, असं मी गेल्या पंधरा वर्षापासून बोलत होतो. शेती क्षेत्रात माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी ही साहेब काहीही बोलतात, असे बोलायचे. मात्र आज मला आनंद आहे की आपल्या देशातील शेतकरी इंधन उत्पादनामध्ये बायो फ्युलच्या माध्यमातून आपला वाटा देत आहेत. देशात इथेनॉल वर आधारित पेट्रोल पंप सुरू होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR