21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयदेशात ५ वर्षांत प्रथमच एटीएमची संख्या घटली!

देशात ५ वर्षांत प्रथमच एटीएमची संख्या घटली!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाच वर्षांत प्रथमच देशातील एटीएमच्या संख्येत घट झाली आहे. सरकारने काल संसदेत ही माहिती दिली. महानगरे, शहरे आणि निमशहरे आणि ग्रामीण भागातही एटीएमची संख्या घटली आहे. सप्टेंबर २०२४ अखेर देशात एटीएमची संख्या २,५५,०७८ होती. तत्पूर्वी ही संख्या २,५७,९४० होती. या तुलनेत अलिकडे ही संख्या घटली.

देशात एटीएमची संख्या १ टक्क्यापेक्षा कमी झाली आहे. सर्वाधिक २.२ टक्क्यांची घसरण ग्रामीण भागात दिसून आली. ग्रामीण भागात सप्टेंबर अखेर ही संख्या ५४,१८६ वर घसरली. आरबीआयने संसदेत सादर केलेल्या डेटावरून असे दिसून येते की, या कालावधीत महानगरांमधील एटीएमची संख्या १.६ टक्के कमी होऊन ६७,२२४ वर आली आहे. गेल्या ५ वर्षात पहिल्यांदाच एटीएम सेंटर्सची संख्या कमी झाली आहे. महानगर, शहर, निमशहरी भाग आणि ग्रामीण भागातील एटीएम सेंटर्सची संख्या घटली आहे.

सप्टेंबर २०२४ मध्ये भारतात २ लाख ५५ हजार ७८ एटीएम सेंटर्स होती. गतवर्षी ही संख्या २५७९४० होती. म्हणजेच एटीएम सेंटर्सच्या संख्येत १ टक्के घट झाली. सर्वाधिक एटीएम सेंटर्स कमी होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागात २.२ टक्के घसरण पाहायला मिळाली. ग्रामीण भागात ५४१८६ एटीएम केंद्र आहेत. मेट्रो शहरात म्हणजेच महानगरांमध्ये ६७२२४ एटीएम सेंटर्स आहेत. शहरी भागात ५९०१८, निमशहरी भागात ७४६५० एटीएम केंद्रे आहेत.

सरकारी बँकांनी दिलेल्या माहितीनुसार बँकांची एटीएम बंद ठेवण्याची कारणे आहेत. यामध्ये बँकांचे एकत्रीकरण, व्यावसायिक व्यवहार्यतेचा अभाव, एटीएमचे हस्तांतरण आदींचा समावेश आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत सांगितले. यासोबतच बँकर्सच्या मते यूपीआयचा वापर वाढल्याने एटीएम कार्ड वापरण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे रोख रक्कम कमी प्रमाणात लागत असल्याने एटीएमचा वापर कमी झाला. विशेष बाब म्हणजे सप्टेंबर २०२४ पर्यंत ८५६६ व्यवहार यूपीआयद्वारे झाले असून १२२ लाख कोटींची देवाण घेवाण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR