22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरदेश, विदेशातील ३ टन पेंढ खजुरांची आवक 

देश, विदेशातील ३ टन पेंढ खजुरांची आवक 

लातूर : सिद्धेश्वर दाताळ
गेल्या मंगळवारपासून इस्लामी कालगणनेतील रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. मंगळवारी मुस्लीम बांधवांचा पहिला रोजा पार पडला. इफ्तारमध्ये पेंढ खजूर खाण्याची प्रथा असल्याने रमजान महिन्यात खजुरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. यंदा बाजारपेठेत रमजान सुरु होताच विविध खजुरांच्या मागणीत देखील मोठी वाढली झाली आहे. शहरातील बाजारात मध्य पूर्वेच्या देशांमधून येणा-या खजुराला जास्त मागणी आहे.
शहरातील बाजापेठेत विविध प्रकारचे खजूर इाखल झाले आहेत. त्यात ट्यूनिशिया येथील खजूर २०० ते २५० रुपये, तर इराणमधील ब्लॅक लिली खजूर २४० ते २५० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. सौदी अरेबिया येथील नावर जुमेरा खजुरासाठी किलोमागे २४० रुपये मोजावे लागत आहेत. तर मगरुम खजूर १२०० रुपये किलो, मरिगम खजूर ५०० रुपये किलो, सुलतान खजूर २६० रुपये किलो, सुगई खजूर ७०० रुपये किलो, शाख खजूर ४८० रुपये किलो, केमोया खजूर २८० रुपये किलो, सुखरी खजूर ५०० रुपये किलो, सफावी खजूर ८०० रूपये किलो, तसेच पेंड खजूर ६० रूपये किलो प्रमाणे बाजारात विक्री होत आहे. या शिवाय इराकमधील जाएदी खजुरालाही चांगली मागणी असल्याचे व्यापारी शेख मुजीब यांनी एकमतशी बोलताना सागीतले आहे.
शहरातील बाजारपेठेत सध्या अजवा खजुराची किंमत एक हजार ते दीड हजार रुपये किलो आहे. या शिवाय कलमी, ओमानी, मस्कटी खजूर असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. गतवर्षाच्या तूलनेत खजुरांच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. किमिया या खजुराला मोठी मागणी असून, त्याचा दर सहाशे ग्रॅमसाठी १२० ते १३० रुपयांवरुन १५० रुपयांवर गेला आहे. ४० रुपये किलो दराने मिळणा-या साध्या खजुराची किंमतही ६० ते ७० रुपयांवर गेली आहे. शहरातील विविध दुकानात खजूर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR