32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रदोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, शिवसैनिकांची भावना : शिरसाट

दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, शिवसैनिकांची भावना : शिरसाट

मुंबई : प्रतिनिधी
दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात ही शिवसैनिकांची भावना आहे. ज्याला मंत्रिपद नको, आमदारकी, खासदारकी नको. कुठलेही पद नको त्या शिवसैनिकांनी बॅनर लावले आहेत. त्यांचा सन्मान केला पाहिजे. आम्हाला मूळात उठाव करायचाच नव्हता असं सांगत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राजधानी दिल्लीत काही शिवसैनिकांनी ठाकरे आणि श्ािंदे या दोन्ही शिवसेनेला एकत्रित येण्याचे आवाहन केले, त्यावर भाष्य केले.

संजय शिरसाट म्हणाले की, ज्यांनी बॅनर लावलेत त्यांना शिवसेनाप्रमुखांची शिवसेना हवी. आम्ही उठाव केला तर काही लोकांनी गद्दारी केली. शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुडवले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. हे लोकांना आवडले नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने पुढे जाव्यात ही त्या शिवसैनिकांची भावना आहे. त्याचा आम्ही सन्मान करतो. आम्हाला मूळात उठाव करायचाच नव्हता असे त्यांनी सांगितले.

आता आम्ही कितीही पाऊले पुढे टाकली तरी त्यांना वाटेल हे मजबूर झाले आहेत. त्यांना कुणी विचारत नाही म्हणून पुन्हा धावपळ सुरू झाली; म्हणून आम्ही त्या भानगडीत पडत नाही. आम्ही आहोत तिथे चांगल्या मजबूतीने उभे आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत असेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळासाठी आमची कुठलीही मागणी नव्हती. जे मिळाले ते घेतले. मात्र इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण काय? त्यामुळे आमचं आम्ही पाहू. तुमचं तुम्ही पाहा असा टोला शिवसेनेने ठाकरे गटाला लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR