22.3 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeलातूरदोन घरांचे कुलूप तोडून चौदा लाखांचा मुद्देमाल चोरीला

दोन घरांचे कुलूप तोडून चौदा लाखांचा मुद्देमाल चोरीला

लातूर : प्रतिनिधी
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निडेबन रस्त्यावर असलेल्या तुलसीधाम उच्चभ्रू वस्तीमध्ये अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडुन सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण १३ लाख ७५ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील निडेबन रोडवर असलेल्या तुलशीधाम सोसायटीत शुक्रवार व शनिवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सोमेश्वर राचप्पा घाडे व गोपाळ बाबुराव मनदुमले यांचे घरात कोणीही नसलेले पाहुन कुलूप कोंडी तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्या, चांदीचे दागिने जुने वापरते किंमत अंदाजे ९ लाख ८० हजार सहाशे रुपये व रोख रक्कम ३ लाख ९५ हजार रुपये असा एकूण असा एकूण १३लाख ७५ हजार ६०० रुपयेचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

याबाबत सोमेश्वर राचप्पा घाडे (वय-६८) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेज तपासणी केल्यानंतर तीन अज्ञात चोरट्यांनी हे कृत्य केलं असल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळून आले असून याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR