22.2 C
Latur
Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंनी उचलली पंकजा मुंडेंच्या पराभवाची जबाबदारी

धनंजय मुंडेंनी उचलली पंकजा मुंडेंच्या पराभवाची जबाबदारी

बहिणीसाठी भाऊ बनला पाठीराखा

बीड : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीमध्ये बीडची निवडणूक देखील प्रतिष्ठेची ठरली होती. महायुतीकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी एवढ्या दिवस विरोधक म्हणून काम करणारे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रचार केला. धनंजय मुंडे यांच्या अथक प्रयत्नांनंतर देखील बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे ६ हजार ५५३ मतांनी विजयी झाले. या पराभवानंतर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत पंकजा मुंडेंच्या पराभवाची जबाबदारी स्वत: स्वीकारली.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत बीडमधील पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. ते म्हणाले, ‘पंकजा मुंडेंच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. या पराभवाचे मला दु:ख आणि खंत आहे. बीडच्या जनतेचे मी आभार मानतो की देशात सर्वाधिक मतदान झालेल्या पहिल्या बारा उमेदवारांमध्ये आमच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना स्थान मिळाले. त्यांचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला याचे दु:ख मला आहे, असे मत त्यांनी मांडले.

पुढे धनंजय मुंडे म्हणाले, लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचे नुकसान झाले आहे. विधानसभेत चित्र काय असेल ते मी आजच सांगत नाही. येणारा काळ ठरवेल. आज त्यावर बोलणे फार लवकर होईल, असे मत धनंजय मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मांडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR