27.1 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रधनगर समाज आता अनुसूचित जमातीत!

धनगर समाज आता अनुसूचित जमातीत!

धनगर आणि धडखडबाबत लवकरच जीआर
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात धनगर समाजाला एनटी संवर्गातून आरक्षण मिळत आहे. पण देशात सर्वत्र धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून (एसटी) आरक्षण मिळत आहे. त्यामुळे राज्यातील धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे, यासाठी पंढरपुरात उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत धनगर आणि धनखड एकच आहेत, यासंबंधीचा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आगामी काळात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश होऊ शकतो.

पंढरपुरात उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांच्या भेटीसाठी मी आणि मंत्री चंद्रकांत पाटील गेलो होतो. आज सुटीचा दिवस असतानाही सर्व सिनियर अधिका-यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची धनगर आणि धनखड हे एकच आहेत, अशा पद्धतीचा स्वतंत्र जीआर सरकारने काढावा, अशी मागणी होती.

जीआर काढण्यासाठी
५ सदस्यीय समिती
धनगर आणि धनखड हे एकच आहेत, असा जीआर काढण्याची धनगर समाजाची मागणी आहे. आता हा जीआर कशापद्धतीचा असावा, यासाठी तीन वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि सकल धनगर समाजाचे ५ प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती जीआरचा मसुदा कसा असावा, यावर विचार करेल. चार दिवसांत बैठक घेऊन ड्राफ्ट तयार केला जाईल. त्यावर अ‍ॅडव्होकेट जनरल साहेबांचे मत घेतले जाईल आणि पुढची कार्यवाही सकारात्मक केली जाईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR