22.3 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeमहाराष्ट्रधर्माचा वापर करून मविआचा ‘वोट जिहाद’

धर्माचा वापर करून मविआचा ‘वोट जिहाद’

देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस ‘वोट जिहाद’ करत आहेत, हे खेदजनक असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सज्जाद नोमानी यांनी १७ मागण्या दिल्या आहेत. या मागण्या खूप भयानक असल्याचे फडणवीस म्हणाले. यामध्ये मुस्लिमांना १० टक्के आरक्षण द्या, दंग्यातील जे मुस्लिम आरोपी आहेत, त्यांच्यावरील केसेस परत घ्या, आरएसएसवर बंदी घाला अशा मागण्या आहेत. याबाबत उलेमा बोर्डने १७ अटींच्या मागण्या मान्य करू असे सुद्धा सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.

सज्जद नोमानी ‘वोट जिहाद’ करायला सांगतायत. ‘वोट जिहाद’चे सिपेहसालार हे शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले आहेत असे सांगतात. निवडणुकीच्या काळात इतके लांगुलचालन आम्ही यापूर्वी कधी बघितलं नव्हतं. अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याविरुद्ध सगळ्यांना एक व्हावं लागेल. जी बहुसंख्य मते आहेत, त्यांना पुनर्विचार करावा लागेल, एक व्हावं लागेल असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, यापेक्षा भयानक नोमानीचा दुसरा व्हीडीओ
आला, त्यात काही लोकांनी लोकसभेत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान केले तर त्यांना शोधून काढा आणि दाणापाणी बंद करा, सोशल बायकॉट करा असे ते सांगत आहेत. स्वत:ला सेक्युलर म्हणून घेणारे महाविकास आघाडीचे लोक यावर एक शब्द बोलत नाहीत. हे एक्स्ट्रीम पोलरायझेशन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी करत आहे, त्याला निश्चितपणे उत्तर देऊ असे फडणवीस म्हणाले.
सोशल बायकॉट करणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे.

किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात इलेक्शन कमिशनला एक तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक राहावं लागेल, एक आहे ते सेफ आहेत असे सांगितले आहे. आज काँग्रेस जाती-जातीत विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने काँग्रेस मुस्लिम समाजाचा एक्स्ट्रीम पोलरायझेशन करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही. ते विकासावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे रोडमॅप नाही. फक्त जातिवाद करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR