27.5 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeधाराशिवधाराशिव येथे तोतया सीबीआय पोलिसाचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा

धाराशिव येथे तोतया सीबीआय पोलिसाचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा

धाराशिव : प्रतिनिधी
सीबीआय पोलीस असल्याची थाप मारून एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील सोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. ही फसवणुकीची घटना दि. २९ जून रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरातील समता कॉलनी येथील नगर परिषदेच्या अकरा नंबर शाळेसमोर घडली. या प्रकरणी फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरिक प्रकाश परंडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाणे येथे दि. २९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील समता कॉलनी येथे नगर परिषदेच्या अकरा नंबर शाळेसमोर प्रकाश श्रीनिवासराव पंरडेकर यांचे घर आहे. दि. २९ जून रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास प्रकाश परंडेकर हे त्यांचे घराचे गेटजवळ होते.

त्यावेळी त्यांच्या घरासमोर एका अनोळखी व्यक्तीने मी सीबीआय पोलीस आहे, अशी बतावणी करुन प्रकाश परंडेकर यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. त्यांची फसवणूक करून तेथून निघून गेला. या प्रकरणी प्रकाश पंरडेकर यांनी दि. २९ जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR