धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओम प्रकाश राज निंबाळकर यांनी दहाव्या फेरी अखेर एक लाख 27 हजार 200 पेक्षा अधिक मताने आघाडी घेतली आहे 2019 मधील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी एकूण एक लाख 27 हजार मताधिक्य घेऊन विजय संपादन केला होता.
त्या तुलनेत यावेळी 2024 मध्ये त्यांनी दहाव्या फेरीतच मागील वर्षीपेक्षा अधिक लीड घेतली आहे अद्याप वीस फेऱ्या बाकी आहेत तसेच प्रत्येक फेरीत मताधिक्य वाढत आहे त्यामुळे तिसाव्या शेवटच्या फेरीपर्यंत किमान ते अडीच ते तीन लाख मताने विजयी होतील असा अंदाज आहे