19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरधिरज देशमुख यांना ग्रामीणमधून पुन्हा आशीर्वाद द्या

धिरज देशमुख यांना ग्रामीणमधून पुन्हा आशीर्वाद द्या

लातूर : प्रतिनिधी
मागच्या ५० वर्षात विकासाचा वारसा निष्कलंकपणे सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन निष्ठेचा वारसा मांजरा परिवाराने जपलेला आहे सत्ता असो की नसो कायम आम्ही आपल्या मदतीला धावून आलो आहोत. धिरज देशमुख यांनी मागच्या पंचवार्षिक कार्यकाळात १५०० कोटी रुपयांची  विकास कामे केली आहेत यापेक्षा अधिक कामे येणा-या काळात  एक मॉडेल  राज्यात आदर्श मतदार संघ घडवण्यासाठी आमदार धिरज देशमुख यांना पुन्हा मतदारांनी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी  केले.
लातूर येथील विष्णुदास मंगल कार्यालयात रेणापूर तालुक्यांतील कामखेडा जिल्हा परिषद सर्कलमधील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी आयोजित संवाद बैठकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते.. यावेळी रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जागृति शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणाचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, रेणाचे संचालक लालासाहेब चव्हान, माणिक सोमवंशी, अँड शहाजी हाके, जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, नागनाथ कराड, शहाजी हाके, विश्वासराव देशमुख हरिराम कुलकर्णी, सतीश पाटील, अमर वाकडे आदि मान्यवर उपस्थित होते.
लोकनेते विलासराव देशमुख यांनी राज्यातील लोकांची कामे केली
यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, ही निवडणूक विकासाची आह. आपल्या परिवाराने शेतक-यांचे मंदिरे तयार केले आहेत. याचे नाते आपले थेट चुलीचे नाते असून तालुक्यातील रेणा साखर कारखान्याने अतिशय सूक्ष्म नियोजन करून अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला आहे तर शेतक-यांच्या आर्थिक मदतीसाठी लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख यांनी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी रक्कम देवुन राज्यात नव्हे देशात नावलौकिक मिळविला आहे या भागात विकासाचे काम झालेली आहेत तरुण आमदार धीरज देशमुख यांनी स्वत: पाठपुरावा करून शासनाकडून निधी खेचून आणला आहे भविष्यात चांगले कार्य करतील असा विश्वास व्यक्त करून लोकनेते विलासराव देशमुख यांनी ज्या पद्धतीने सर्व समाजाला सोबत घेऊन कार्य केलें कुणाची जात बघितली नाहीं. गेली ५० वर्षापासून मांजरा साखर परिवार सदैव निष्कलंक पने विकासाचा विश्वासाचं नातं  निष्ठेचा वारसा चालवत आहे त्या परिवाराच्या पाठीमागे ऊभे राहून काँग्रेस आघाडीचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे  राहून अधिक मताधिक्य देवुन  निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
आदर्श नेतृत्वाचा वारसा  जपा : यशवंतराव पाटील
यावेळी बोलताना रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील यांनी १९८० साली लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरकरांच्या विकासाचे स्वप्न बघितले होते त्यांनी त्यांच्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवत राज्यभर लोकांची कामे केली आपल्या भागात गावागावात जाऊन लोकांच्या कामाला प्राधान्य दिले कधी कुणाची जात बघितली नाहीं सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी या तालुक्यात विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न केले आज त्यांच्याच नेतृत्वाखाली रेणा साखर कारखाना ३०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभा आहे शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम या परिवाराच्या माध्यमातून झाले आहे हे नेत्रुत्व जपण्यासाठी आमदार धीरज देशमुख यांना खंबीर साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
धनगर समाजाला सरकारने  फसवले: अ‍ॅड. हाके 
यावेळी रेणापूर बाजार समितीचे उपसभापती अ‍ॅड. शेषराव हाके यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने तारीख पे तारीख देत समाजाला आरक्षण देण्याचे खोटे आश्वासन दिल्याचे सांगून त्यांना येणा-या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पराभूत करणार असून महविकास आघाडीचे उमेदवार आमदार धीरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना अधिक मताधिक्याने निवडून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संभाजी सुळ, अमर वाकडे, प्रमोद कापसे, धनराज देशमुख, सचिन दाताळ, अशोक राठोड,  प्रदीप राठोड,  बाळकृष्ण माने, शुभम पडूळकर, प्रकाश सूर्यवंशी, रामहरी गोरे, हंसराज देशमुख, संग्राम माटेकर, रमेश सूर्यवंशी, एकनाथ पाटील, राजाभाऊ साळुंके, आशादुल्ला शेख,  नागरगोजे यांच्यासह रेणा चे संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक कोंग्रेसचे बूथ प्रमुख विविध सेल चे प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR