23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रधोका झाला तर समाजाचा मोठा अपमान

धोका झाला तर समाजाचा मोठा अपमान

- विधानसभेला अनेक समाजाचे लोक एकत्र मैदानात उतरविणा - जरांगे पाटलांचा इशारा

जालना : प्रतिनिधी
मराठा समाजाला जर तुम्ही आरक्षण नाही दिले तर विधानसभेला ४ ते ५ समुदायाचे लोक एकत्र मैदानात उतरणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण देऊ म्हणाले असल्याने सरकारचा सन्मान म्हणून एका महिन्याचा वेळ दिला आहे. सरकारने दगाफटका करू नये, नाही तर रस्त्यावर उतरू, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, सग्यासोय-यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. काल सरकारच्या मध्यस्थीने त्यांचे उपोषण स्थगित झाले. पुढे बोलताना जरांगे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार राजेंद्र राऊत आले होते. ते म्हणाले फडणवीसांशी बोलणे झाले असून एसआयटी रद्द करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. एसआयटी ही माझी मागणी नाही, सागेसोयरे ही समाजाची मागणी असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

आंदोलन सोडणार नाही…
माझ्यामुळे जर कोणी निवडून आले असे म्हणत असेल तर त्यांचा मोठेपणा असून मी समाजासाठी लढत असल्याने तसे म्हणत असतील. टेबल वाजवणारे नाहीत म्हणून ते येत असतील असेही जरांगे पाटील म्हणाले. मंत्री शंभुराजे देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांची बैठक घेणार आहे. आजपासून खूप कामाला लागणार आहोत. मुंबईत मोठ्या घडामोडी होणार आहेत. अन्याय करायचा प्रयत्न केला तर मी मागे हटणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मी आता घरी जाणार आहे. तिथे जाऊन रणनीती ठरवणार आहे. राज्याच्या पातळीवरचे काम आता आजपासून सुरू आहे. मी घरी, डोंगरात गेलो तरी आंदोलन सोडणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR