लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील साई येथे जलजीवन मिशन अंर्तगतच्या नळ कनेक्शन संदर्भात वरिष्ठ कार्यालयात तक्रार का केली म्हणून येथील उपसरपंचांनी गावातील तकार कर्त्यास व त्यांच्या कुटूंबीयांना मारहाण केल्याची व जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी संभाजी विजयकुमार पवार यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात उपसरपंचासह इतर दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर तालुक्यातील साई येथे जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली असून या योजने अंतर्गत संभाजी निजयकुमार पवार यांना नळ कनेक्शन देण्यात आले नसल्यामुळे त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे या संदर्भात तक्रार केली असून या संदर्भात दि. ६ रोजी सकरळी ११ वाजता ग्रामसेवक पाहणी करण्याकरीता आले असता उपसरपंच अमोल श्रीपती पवार, सचिन ळीपती पवार, दत्ता विलास पवार, सुरज पवार हे हातात काठ्या घेऊन घरात घुसले व तु वरीष्ठ कार्यालयात तक्रार का केलीस म्हणूनकाठीने मारहाण केली तक्रारकर्त्याची आई सोडवण्यास गेली असता त्यांना ही ढकलून दिल तुला आता नळ कनेक्शन कोण देतो बघून घेतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात संभाजी विजयकुमार पवार यांनी दिली असून या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाख केला असून याचा अधिक तपास एमआयडीसी पोलीसांकडून सुरू आहे.